पण माझ्या ओळखपत्रावरचा पदार्थविज्ञान हा शब्द बघितला की मावळे ज्या तडफेने किल्ल्यांचे रक्षण करायचे त्याच तडफ़ेने त्या बाई मराठी साहित्याचे 'रक्षण' करीत असत.
मला स्वतःला या गोष्टीचा विद्यार्थी दशेत राग यायचा, परंतु आता स्वतःच ग्रंथपाल झाल्यानंतर मात्र ही संग्रह व वाचकांची संख्या यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नातून पडणारी मर्यादा असते हे जाणवले. उदा. पानिपत सारखी पुस्तके मागणारे १०० वाचक असले तरी (किमतीमुळे) त्या पुस्तकाच्या १०० प्रती घेता येणार नाहीत. त्यामुळे काही निकष लावून त्यासंदर्भात काही निर्णय घ्यावा लागतो. (मी स्वतः अशा पुस्तकांसाठी प्राधान्यक्रम ठरवून त्या क्रमाने मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. मात्र हे वाचकांच्या सहकार्यांवरच अवलंबून राहते. बऱ्याचदा प्राधान्यक्रमाने विशिष्ट वाचकानंतर येणाऱ्या वाचकाऐवजी दुसराच कोणीतरी परस्पर पुस्तक स्वतःकडे घेतो, व क्रमशः येणाऱ्या पुढच्या व्यक्तीच्या शिव्या खाव्या लागतात. अर्थात हा सार्वत्रिक अनुभव नसतो, हे समाधान.)
अवधूत.