मग करायच काय. आज मराठी भाषिकांचा पक्ष म्हणुन शिवसेना मिरवतोय. मराठी पक्ष म्हणुन मराठी माणुस शिवसेनेकडे आशेने बघतोय. हिंदूत्व सोडल्यास हे शक्य आहे का ?
त्यांना कळेल अश्याच भाषेत उत्तर देणे. द्या महानगरपालिका एखाद्या राजनाथसिंहाकडे. करा दोन-चार यादव आमदार. द्या खासदारकी शहा-मेहतांकडे. मग बघा शिवसेनेचा मराठी माणसाबद्दलचा कळवळा कसा उफाळून येतो.
शिवसेनेला 'रस्त्यावर' आणा. शिवसेना ही रस्त्यावरच शोभून दिसते. सत्तेवर गेल्यावर त्यांचा 'मोरू' होतो.