घरात असलेली पुस्तके पुढे आपली मुले-नातवंडे वाचतील असा विचार करून विकत घेणे हे अशी पुस्तके विकत घेण्याचा मानदंड ठरविता येतील.  तसेच ती पुस्तके आपल्या मित्रवर्गात अवश्य द्यावीत.  पण ती कोणाला दिली याची नोंद ठेवावी.

१० चित्रपटाच्या/नाटकाच्या तबकड्या घेतल्यावर एक पुस्तक जरूर विकत घेण्याचा प्रघात/निर्धार ठेवावा.  नुसती मराठी नव्हेत पण इंग्लीश पुस्तके संग्रहात ठेवावीत.

मनोरंजनात्मक बरोबर विचारात्मक पुस्तकांचा संग्रह ठेवावा.

इथे बॉर्डर्स, बार्न्स & नोबल, डाल्टन्स अशा पुस्तके विकणाऱ्या दुकानांच्या शृंखला असतात.  मला सांगायला अभिमान वाटतो कि मॉलमध्ये खरेदीसाठी गेले असता अशा पुस्तकांच्या दुकानाला तसेच सार्वजनिक वाचनालयाला भेटी देण्याच्या माझ्या छंदाचे माझी मुले अनुकरण करतात.  त्यामुळे त्यांच्या वाचनाला आणि विचारांना प्रगल्भता आली आहे.

आम्ही भेटी देण्यासाठी जेव्हा स्वस्तात पुस्तके मिळतात तेव्हा आणून घरी ठेवली असतात.  ती मुलांच्या वाढदिवसासाठी किंवा इतर प्रसंगी खूप उपयोगी पडतात.

श्री. द्वारकानाथांचा मुद्दा खरा आहे.  आपण जितक्या सहज उपहारगृहात खाण्यासाठी किंवा चित्रपटगृहात नाट्यगृहात जातो त्याच्या कितीतरीपट कमी पुस्तकांच्या दुकानात वा वाचनालयात जातो.  माझ्यामते हा छंद शिक्षक आणि पालकांनी आपल्या मुलांना लाविला पाहिजे.

माझे विचार.

कलोअ,
सुभाष