नामे, विशेषणे कितीही नवी आली तरी ती भाषेत सामावून घेता येतील/येतात. मात्र क्रियापदांचे असे होत नाही. नेमकी क्रियापदे न सापडल्याने त्यांची इंग्रजी धातुसाधिते वापरून शेवटी असणे किंव करणे क्रियापदाची रूपे वापरावी लागतात/वापरली जातात, त्याचे दुःख होते.

क्रिबणे, मगणे, डीबगणे, प्रोग्रॅमणे, गूगलणे ... अशी अनेकानेक क्रियापदे तयार करून आपल्या मित्रमंडळींत वापरू लागले पाहिजे, म्हणजे काही काळाने ती रूढ होतील.

नवे शब्द कोठे लागतात / बनवले जातात ?

१ कविता करताना. कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असल्याने तो आवश्यकतेप्रमाणे नवे शब्द बनवतो ... आणि नंतर ते रूढ होतात.

२. शास्त्रीय किंवा वैज्ञानिक लेखनात नेमकेपणा आणण्यासाठी नवे नवे शब्द तयार करावे लागतात/ केले जातात .

३. विनोद. गमतीदार लिहिताना, अनेकवेळा मित्रमंडळींत हास्यविनोद करताना नवे नवे शब्द जन्मास येतात आणि नंतर रूढ होतात. (उदा. अनु ह्यांचे मनोगतावरचे लेख पाहावे.)

अशा प्रकारे 'काव्यशास्त्रविनोदेन' भाषेत भर घालता येईल!!