मी पैज लावायला तयार आहे कि येथे लिहिणाऱ्यांपैकी एकाचीही आर्थिक परिस्थिती अशी नाही की त्याला महिन्या-दोन महिन्यात शंभर-दोन्शे रुपये पुस्तकांवर खर्च करता येणार नाही.
माझ्या स्वतःकडे अशी ५० तरी मराठी पुस्तके (व शेकडो इतर) स्वतः विकत घेतलेली आहेत जी मी विद्यार्थी-दशेत ग्रंथालयातून, मित्रांकडून आणून वाचलेली होती. त्यातील अनेक लेखक/पुस्तकांनी माझी विचारसरणी (आणी विचार करण्याची ताकद) घडवली/वाढवली. आज मी स्वतः मिळवतो. इश्वर-कृपेने माझ्या चैनीखातरही थोडे पैसे उधळू शकतो. ती पुस्तके मी पुन्हा कधी वाचेन असे वाटत नाही पण ज्यांच्या लेखणीनी मला घडवले त्या लेखकांना थोडी कृतज्ञता दाखवण्यास त्यांची पुस्तके विकत घेतो. हा माझा मोठेपणा नव्हे तर 'बोले तैसा चाले' असल्याची ग्वाही आहे.
सहमत आहे. माझ्या बाबतीत हा आकडा कदाचित ५०० असेल.
नव्या पुस्तकांना जागा करून देण्यासाठी आणि आपण वाचलेली चांगली पुस्तके इतरांपर्यंत जावी म्हणून मी ती माझ्या अमेरिकेतल्या नातेवाईकांना भेट म्हणून पाठवतो.