स्वाती,

आज तुमचा लेख वाचून जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला...

'डायरी ऑफ ऍना फ्रँक' वाचताना विशेष करून जाणवते ते म्हणजे ऍनाच्या वयाच्या १३ व्या वर्षापासून, १५ व्या वर्षा पर्यंत तिच्यात होणारा तारुणसुलभ बदल!

आणि त्या महयुद्धाच्या वातवरणात आणि त्या कोंडवाड्यातही तिचे व पीटरचे ( नाव नक्की आठवत नाही...) उलगडत जाणारे प्रेम!

'डायरी ऑफ ऍना फ्रँक'  ची मराठी आवृत्ती, मी वयाच्या १३ व्या वर्षी वाचली आणि नंतर १५ व्या वर्षी इग्लिश आवृत्ती वाचायला मिळाली... त्यामुळे मला तिच्या त्या सर्व भावना फार जवळच्या वाटल्या... आणि तेंव्हा पासून ऍना एक जिवाभावाची मैत्रिण वाटली...

आज हा लेख वाचताना मी देखील ऍमस्टरडॅम ला जाऊन आले... आणि ऍनाच्या त्या वेदना, त्या हळुवार भावना पुन्हा जगायला मिळाल्या!