... ची दिवाळी अंकाची कल्पना आवडली.

या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?

अशी यादी करणे हेच मोठे आव्हान आहे. ही सुरवात आहे... संवादाचे आणि वाचनाचे एक साधन अंतर्नाद पुरविते आहे.
ही यादी परिपूर्ण असो वा नसो, पण जनमानसाची (किंवा किमान अंतर्नादच्या वाचकवर्गाची) आवडीचे प्रतिबिंब आहे. जे आहे ते असे आहे इतकाच त्यांचाही दावा आहे.

मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?

मराठी साहित्याचे नसले तरी मराठी वाचकांच्या मनात घर करून असलेल्या साहित्याचे ही यादी नक्कीच प्रतिनिधित्व करते.
अवांतर - अंतर्नादची काही चाचणी असेलच तर मी त्यांत सपशेल नापास (६/२०) आहे. पण माझी यादी वेगळी आहे... त्यामुळे बिलकुल खंत वाटत नाही.

पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल? 

किमान येत्या काही वर्षात तरी यातील कोणतेही पुस्तक खरेदी न करण्याची शक्यता अधिक!
कारण १ - येथील यादीने मी भारावलेलो नाही. मराठीतील येत्या वर्ष/ दोन वर्षात काय वाचायचे याची जंत्री मनात तयार आहे.
कारण २ - अलिकडे इंग्रजी वाचन अधिक होते. ते कमी करण्याची सुतराम शक्यता नाही.