सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये आजूबाजूच्या शहरांतील ग्रंथालयांमधून त्याच पुस्तकाच्या प्रती मागवता येऊ शकतात.   तशी निदान मी राहते त्या शहरात यंत्रणा आहे. 

मला वाटते मुंबईत बी. सी. एल. ची आणि आय. आय. टी. च्या ग्रंथालयांची देखील पद्धत आहे की काही महाविद्यालयांचे विद्यार्थी या संस्थांच्या ग्रंथालयातून पुस्तके उसनी आणू शकतात.  तसे पुण्यात ही असेलच म्हणा कुठेतरी.  पण असे केल्यास पुस्तक न मिळणे किंवा हिरमोड होणे हे त्या मानाने कमी होईल असे वाटते.

शिवाय मला वाटते आपल्याकडे देणग्या देऊन वगैरे देखील पुस्तकांसाठी/ग्रंथालयांसाठी योजना तयार करता येतील - पण त्याला पैसा आणि इच्छा दोन्ही पाहिजे.

 

सुहासिनी