या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?
या यादीची निवड नेमकी कशी केली गेली (जरी वर थोडक्यात दिले असेल तरी) ते करून घ्यायला आवडेल. यांत विज्ञानकथा, प्रवासवर्णने, गूढकथा यांचा समावेश नाही, असे लिखाण मराठीत तुटपुंजे असले तरी ते अश्या चाचण्यांत जाणूनबुजून दूर सारले जाते की वाचकवर्ग अशा साहित्याच्या पातळीवर पोहोचलाच नाही हे जाणून घ्यायला आवडेल. याखेरीज फिक्शन व नॉनफिक्शन* (मराठी शब्द आठवले नाहीत) अशा दोन वेगळ्या याद्या असायला हव्या होत्या असे वाटते.
पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?
यातली ५ पुस्तके भारतात घरात आहेत ती वडिलांनी खरेदी केली होती पण या यादीतील एकही पुस्तक खरेदी करणार नाही (वाचायला मिळाल्यास वाचेन मात्र नक्की) कारण आवड मेळ खात नाही. अर्थात आवडीची पुस्तके खरेदी करायला आवडतात पण ती यांतील नाहीत.
मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?
कल्पना नाही कदाचित करत असावी. परंतु यावरून मराठी साहित्य हे विस्तृत व परिपूर्ण नाही याची खात्री होते. माझे गुण ७/२० पण त्याबाबत अजीबात खंत नाही कारण या पुस्तकांची कधीच आवड नव्हती (अपवाद: रणांगण आणि स्मृतीचित्रे[-फारच लहानपणी वाचल्याने मनात घर करून राहिले.])