गप्पाटप्पा करायला लेख चांगला आहे. बरीचशी शेरेबाजी अगदी वरवरची आणि अभ्यास/समर्थन/पुरावे न देता केलेली आहे.
काही उदाहरणे -
- मराठ्यांचा उत्तरेतील वावर - पेशव्यांना फक्त स्वार्थ महत्त्वाचा होता आणि दिल्लीस्वारीमागे लुटालुटीखेरीज काहीही भव्य हेतू नव्हता ही वृथा* ओरड काही नवी नाही. डोईफोडेंनी फक्त रोख शाहूंवर लावलेला आहे इतकाच काय तो फरक. दिल्लीच्या तख्ताची hegemony जिवंत ठेवणे हे मराठी नेतृत्वाला तेव्हा गरजेचे वाटले ही वस्तुस्थिती आहे. त्यांत पेशवे/ शिंदे/ होळकर असे सारेच आले. शाहूंचा फारसा प्रभाव होता असे दिसत नाही. बादशाहाला नामधारी ठेऊन मराठेच दिल्लीवर राज्य करीत होते.
- महाराष्ट्राबाहेरील मंडळींनी महाराष्ट्रात सचिव/ राजकीय पदे भूषविली अशी जंत्री दिलेली आहे. but then so what? ह्या अमराठी लोकांना परकीय मानूनही यात महाराष्ट्राची पीछेहाट कशी हा विषयही नेहमीसारखाच मोघम ठेवलेला आहे. दुसरे म्हणजे या परिस्थितीचा दोष(?) मराठा नेतृत्वावर कसा आणि ब्राह्मण नेतृत्वावर का नाही हेही स्पष्ट नाही.
- टिळक आणि महाजन तसेच महाजन आणि यशवंतराव ही तुलनाच उथळ आहे. खरेतर तुलना केलेली नाहीच... नुसती एक फुसकली सोडलेली आहे इतकेच.
अवांतर - नेत्यांना जातीय लेबले लावणे हा भारतीय मानसिकतेचा भाग आहे... पत्रकारितेची सवय आहे. मला टिळकांकडे, महाजनांकडे ब्राह्मण म्हणून पाहणे आणि यशवंतरावांकडे मराठा म्हणून पाहणे मान्य नाही.
- पूर्वी ब्राह्मण सर्वत्र पुढे होते याचा दाखला देताना साहित्य/ कारखाने/ क्रीडा/ संशोधन अशी उदाहरणे दिलेली आहेत. याच क्षेत्रातील जातीनिहाय शिरगणती** आजही करून पाहा. कदाचित ब्राह्मणच आघाडीवर दिसतील.
- आजच्या काळातील ब्राह्मणांची पीछेहाट किंवा हकालपट्टी दाखविताना मात्र राजकीय सत्तेचे संदर्भ आहेत.
राजकीय सत्तेचा विचार करता... युगानुयुगे ती प्रामुख्याने पाटील/ देशमुख यांच्याकडे राहिलेली आहे. पीछेहाट किंवा हकालपट्टी व्हायला इतर*** समाज सत्तेवर होता कोठे****?
- डोईफोडेंनी केलेला दावा - ब्राह्मण समाजाकडेच बहुतेकवेळा प्रवक्तेपद वगैरे नेमके काय सांगतो हे मला कळत नाही. प्रवक्तेपदाची पक्षात ताकद नसते असे नाही... पण बऱ्याचदा ही भूमिका एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची असते. वकीलाची/ तह बोलणी इत्यादी सेवेची भूमिका कदाचित जुनीच आहे.
- प्रभावशाली जनसेवेसाठी व्यापक आवाका (परराष्ट्रीय धोरण) आणि लोकांच्या दैनंदिन गरजांचे विषय (साखर कारखाने) या दोन्हीची सांगड आवश्यक आहे. डोईफोडे पुस्तकी जगाला***** कांकणभर अधिक महत्त्व देतात असे दिसते. ते मला चुकीचे वाटते. आजचे खरी अडचण आहे ती मौनीबाबांची ... global आणि local दोन्ही आघाड्यांवर बोंबाबोंब!
* समर्थन देण्यास पुरेसा वेळ माझ्याकडे नाही म्हणून टाळतो आहे. नाहीतर माझाही डोईफोडे करायला मंडळी सापडतील!
** मला ही अशी जातीय विभागणी विकृत वाटते. ही विभागणी अकृत्रिमही आहे. जाता जाता एक उदाहरण द्यायचेच झाले तर हिंदुस्थानी संगीताचे देता येईल. हिंदुस्थानी संगीताची परंपरा चालविणारी वेगवेगळी घराणी जरूर आहेत... पण त्यांची धर्मवार फाळणी होताना दिसत नाही.
*** इतर हा शब्द मराठेतर या अर्थाने ढोबळपणे वापरलेला आहे. ब्राह्मण किमान प्रभावशाली पदांवर तरी असायचे... बहुजन समाज तर पूर्णपणे काळोखात होता. लोकशाही रचनेमुळे मराठेतर समाजाला सत्ताकारणात प्रवेश करण्याचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत याचे स्वागतच आहे.
**** "कोठे?" याचे उत्तर म्हणून पेशवाईचे उदाहरण देता येईल हे मान्य आहे. पेशव्यांइतपत नसेल पण ब्राह्मणसमाजाचे प्रतिनिधित्व हा प्रभावशाली पदांवर होतेच.
***** परराष्ट्रीय धोरणाला पुस्तकी जग असे संबोधून त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न नाही. दरबारी राजकारणाचे (diplomacy) मोल प्रचंड आहे याची जाणीव आहे. आमदार/ नगरसेवक यांच्या तुलनेत खासदार हा दरबारी राजकारणाचा अभ्यासू असणे अधिक गरजेचे असावे अशी माझी अपेक्षा असते.