पत्त्याचे वाटप लॅडीसप्रमाणे- सातच्या पुढचे पत्ते. पत्त्यांना गुण खालीलप्रमाणे
गोटू ३०
नव्वी २०
एक्का ११
दश्शी १०
राजा ३
राणी २
प्रत्येकाने आपल्या व आपल्या संभाव्य पार्टनरच्या कुवतीचा अंदाज घेऊन बोली लावायची. बोली दीडशेपासून सुरु होते.पार्टनर ठरलेला किंवा अमुक एक गोटू ज्याच्याकडे तो. हुकुमाची बोली लॅडीसप्रमाणेच. उरलेले दोघे आपोआप पार्टनर होतात. पहिल्या वाटपात फारच चांगली पाने असल्यास एकट्याच्या बोलीवर पहिल्या हातातच एकट्यालाच ३०४ बोलता येतात. (वख्खईप्रमाणे)
हुकुम बोलणाऱ्याकडे राजा-राणी अशी कुठल्याही रंगाची जोडी असल्यास त्याचे वीस गुण बोलीच्या आकड्यातून कमी होतात. हुकुमाची जोडी असल्यास चाळीस. प्रतिस्पर्ध्याकडे अशा जोड्या असल्यास तसे गुण बोलीच्या आकड्यात वाढतात. जोडी जाहीर करण्यापूर्वी त्या त्या पक्षाचा एक तरी हात होणे आवश्यक.
कोण किती हात जिंकतो यासाठी लाल व हिरव्या सिग्नलची एक पद्धत आहे, पण तिचा मूळ खेळाशी काही संबंध नाही.
खूप दिवस झाले पत्ते खेळून!