'अंतर्नाद' च्या या उपक्रमात चाचणी वगैरे नाही. पास-नापास ही आपली माझी भर. एका विशिष्ट वाचकवर्गाला कोणते साहित्य महत्त्वाचे वाटते याचा हा आढावा - जनमानसाचा कौल म्हणा हवे तर.
या यादीतील सगळी पुस्तके आपण वाचली नसतील तर त्यात खंत वाटण्यासारखे काहीच नाही. (आतापर्यंतच्या अंदाजानुसार जास्तीत जास्त संख्या १३/२० आहे!) आपली आवड, अभिरुची अगदी वेगळी, तरीही संपन्न, असू शकते.
'अंतर्नाद' चा वाचक आणी मनोगती यांच्या वाचनाच्या आवडी कितपत जुळतात, कुठे मतभेद आहेत, ते का आहेत, हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. ही दोन्ही माध्यमे माझ्या आवडीची आहेत आणि दोन्हीकडेही विचार करणारे वाचक, लेखक आहेत, असे मला वाटते.
या चर्चेवरील प्रतिसादांतून बरेच काही गवसले असे वाटते. प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.