हा माझा पहिला प्रयत्न आहे मनोगत वर लिहिण्याचा. चूकभूल देणे घेणे.
एकलव्याशी ९९.९९% सहमत
डोईफोडेंच्या लेखात एकच गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण आणि मराठ्यांची युती झाली असती तर महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर योगदान आणि महत्त्व फार वेगळे असले असते. अजूनही अशक्य काहीच नाही.
दुसरे असे की ब्राह्मण मराठा इत्यादी लेबले आपण लावतो ... सध्या कुठल्याही कॉलेजात जा ... आणि मुला मुलींच्या जोड्या पाहिल्या तर समान जातीपेक्षा भिन्न जातींच्या च जास्त जोड्या दिसतील
सांगण्याचा मुद्दा असा की समाज अधिक एकसंघ होत चालला आहे आणि डोईफोडेंचे मुद्दे फार तर ऐतिहासिक आहेत. त्यांचा भविष्याशी काहीही संबंध नाही आणि उपयुक्तताही नाही.