ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास्ताची पूर्वकर्मे पूर्ण करण्याआधीच संन्यास घेतल्याने गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा संसारात प्रवेश केला होता, पण त्यांना समाजाने देहान्त प्रायश्चित्त दिले. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी ही घटना घडली.

त्यानंतर सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी दत्त संप्रदायातील  नारायणशास्त्री जालवणकर नामक झाशीच्या एका संन्याशाने स्वेच्छेने संसारात पुनरागमन केले. (संदर्भ: दत्त संप्रदायाचा इतिहास, ले. रा. चिं. ढेरे.) समाजाने त्याला काहीही आक्षेप घेतला नाही.

आता साध्वी रिद्धीश्रींच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे सरकून  अध्यात्मिक क्षेत्रातील लोक अध्यात्माला नवी दिशा देत आहेत. त्यांच्या विवाहाचे (तो विवाह म्हणे गुप्तपणे झाला पण तरीही त्याचे) फोटो वृत्तपत्रात येत आहेत.

असेही वाचले आहे की शृंगार शतक वगैरे काव्यरचना करणाऱ्या भर्तृहरी नामक प्राचीन  कवीने सहा वेळा लग्न करून सात वेळा संन्यास घेतला होता.

एकूण काय, अध्यात्माचा प्रवास हा विठ्ठलपंत आपेगावकर ते स्वाध्वी रिद्धीश्री व्हाया नारायणशास्त्री जालवणकर या मार्गाने व्यवस्थित चालू आहे.

भविष्यात अजून काय घडेल, ते देव (नि ते संन्यासी) जाणोत.

अवधूत.