गोडाच्या शिऱ्यात ताज्या अननसाचे बारीक तुकडे (शेंगदाण्याच्या आकाराचे), आणि ज्या पाण्यात शिरा शिजवायचा त्या पाण्यात किंचित अननसाचा अर्क घालून 'अननस शिरा' मस्त होतो. चव आणि वेगळेपणा ह्यामुळे सर्व लहान थोरांस आवडतो. (अननस गोड बघून घ्यावा.)
वरील प्रमाणे, अननसा ऐवजी केळी आणि केळ्याचा अर्क वापरून 'केळ्याचा शिरा'ही करता येतो.
तसेच, कुठल्याही शिऱ्यात वेलची-पूड लज्जत वाढवते.