कार्यक्रमाचे वर्णन अगदी धावते तरीही तपशीलवार आणि मनाला थेट भिडणारे आहे. अभिनंदन.

बिनसाखरेचा चहा प्यायलात तुम्ही कधी? किंवा बिनसाखरेची बासुंदी खाऊन बघीतलीत? एक वेगळीच पण चांगली चव लागते.

लतादीदींच्या आवाजातील गोडव्याला साखरेची उपमा अगदी चपखल बसावी पण सचिनदांच्या आवाजातील गाणी 'बिनसाखरेच्या चहा किंवा बासुंदी' सारखी वाटत नाहीत. दोन्हीत तुलना नाही.
पण, तुलना करायची झालीच तर, 'साखर घातलेले शिक्रण आणि बिनसाखरेचे शिक्रण' किंवा 'साखर घातलेले फ्रुटसॅलड आणि बिनसाखरेचे फ्रुटसॅलड' अशी करता येईल. बिनसाखरेच्या ह्या दोन्ही पदार्थांत 'साखरे'ची आक्रमकता टाळून शिक्रणातील केळ्याचा आणि फ्रुटसॅलड मधील मधुर फळांचा स्वाद उठून येतो.