रोहिणी,
क्रॉस-स्टीच खूप सोपे आहे. त्याकरता तुम्हाला डिझाईन हवे असल्यास मी माझ्याकडे असलेल्यातले एखादे नक्कीच स्कॅन करून देऊ शकते. याबद्दल एक युक्ती करून तुम्हाला जे डीझाईन हवे ते तुम्ही क्रॉसस्टीचमध्ये विणू शकता. आपल्याला हवे ते चित्र आलेख कागदावर प्रिंट करून घ्यायचं. चित्राबरहुकुम रंगसंगती साधत आलेख कागदातील प्रत्येक छोटा चौकोन विणत जायचा. झालं ! सोपे आणि अवघड असं काही नसतं डिझाईनमध्ये.. जसं चित्रात दिलं आहे तसं विणत जायचं असतं बस्स !

लोकरीचे कोणते विणकाम तुम्हाला येते? दोन सुयांचे की क्रोशाचे? दोन्हीपैकी कोणत्यामध्ये तुम्हाला लहान मुलांचे मोजे आणो स्वेटर विणायला शिकायचे आहे, ते सांगितल्यावर मी देऊ शकेन तुम्हाला कृती.

रुमाल आवडला सांगितल्याबद्दल धन्यवाद. :-)