पुण्यातील आप्पा बळवंत चौक आपणासर्वांना ठाऊकच आहे. नागपुराला 'सदर बाजारात' जुनी पुस्तके छान मिळतात. अशीच काही ठिकाणे जेथे मी सतत जातो.

चिवचीव बाजार - अकोला ,

अंबापेठ - अमरावती,

खजुरी बाजार - इंदौर (इंदूर)

अन्य खरेदीत अगदी 'ढ' असलेला मी , पुस्तकांच्या खरेदीत मात्र समोर असतो. पुस्तकांच्या किमती जास्त आहेत असं मला खरोखर मनापासून वाटतं.

आता पुण्यात एखादे पुस्तक मिळवण्याला विशेष कष्ट पडत नाही. मात्र गावी शाळेत असताना एखादे पुस्तक मिळावे म्हणून लावलेली फिल्डिंग आठवली की मजा येते.

नीलकांत