निरुभाऊ,

घटस्फोटीत बाईला कोणी प्रथमवर देईल असे संभवत नाही.

आजच्या घडीला तुम्हाला जे शक्य वाटत नाही, ते होऊ शकते हे माझ्या आईवडलांनी ३० वर्षापुर्वी दोन्हीकडच्या घरच्यांची परवानगी जिंकून, समाजाच्या विरोधात जाऊन लग्न करून सिद्ध केलं आहे. आज आम्ही सर्व अत्यंत सुखात आहोत. :-)

घटस्फोटाला कायद्याने मान्यता दिली तरी समाजात मान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

अशा समाजाचा भाग बनून रहायचे की असा समाज चढवायचा प्रयत्न करेल असे सर्व चष्मे काढून ठेवून साफ मनाने विचार करून योग्ययोग्य काय याचा स्वतःला प्रामाणिक राहून विचार करायचा आणि पुढील मार्ग ठरवायचा ते आपण ठरवायचे असते. बदलणाऱ्या ऋतूंप्रमाणे रंग बदलणारा समाज खूप जवळून पाहिला आहे आम्ही ( मी आणि माझ्या कुटुंबाने ) आणि आजही बघतो आहोत, त्यामुळे त्यांची फिकीर करणे मला तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही.