वाटपात सत्ती ते राजा आणि एक्के इतकीच पाने असतात.

हुकुमाच्या जोडीबाबत सांगायचे तर एक हात झाल्यावर ती दाखवली तरच आम्ही त्याचे गुण मोजतो. एकापेक्षा जास्त हात झाल्यानंतर दाखवलेली जोडी अवैध ठरते.

भिडू मागताना ज्या खेळीत अमुक-एक पानावरून भिडू मागितला आहे त्याच खेळीत इतर कोणत्या खेळाडूने हुकुमाने तो हात मारल्यास भिडू मागणारा खेळाडू विरुद्ध इतर तिघे असा खेळ होतो.

हुकुमाच्या जोडीचे ४० किंवा हुकुमेतर जोडीचे २० आणि (रोहिणीताईंनी म्हटल्याप्रमाणे) लास्टींग डावाचे १० गुण जोडल्यास ३०४ बोलणाऱ्याला ३२४/३३४,३४४/३५४ असेही बोलता येते.

डावात बोलून हात केल्यास पुढीलप्रमाणे बिल्ले मिळतात -
जिंकल्यास लाल बिल्ले ( उरलेल्या दुर्री ते छक्की मधील बदाम आणि/अथवा चौकटच्या खुणा)
बुडल्यास काळे बिल्ले ( उरलेल्या दुर्री ते छक्की मधील इस्पिक आणि/अथवा किल्वरच्या खुणा)

३०४  दोघांनी केल्यास : प्रत्येकाला २ लाल बिल्ले बुडल्यास २ काळे
३०४  एकाने केल्यास (पहिल्या वाटपात फारच चांगली पाने असल्यास एकट्याच्या बोलीवर पहिल्या हातातच एकट्यालाच ३०४ बोलता येतात) : ४ लाल बिल्ले बुडल्यास ४ काळे

३२४/३३४  दोघांनी केल्यास : प्रत्येकाला ३ लाल बिल्ले बुडल्यास ३ काळे
३३४  एकाने केल्यास (नशीब लागतं!) : ५ लाल बिल्ले बुडल्यास ५ काळे

३४४/३५४  दोघांनी केल्यास : प्रत्येकाला ४ लाल बिल्ले बुडल्यास ४ काळे
३५४  एकाने केल्यास (नशीब बलवत्तर!) : ६ लाल बिल्ले बुडल्यास ६ काळे

इतर गुणांना जिंकल्यास १ लाल बुडाल्यास १ काळा बिल्ला प्रत्येकी.

अवांतर:
( कोण किती हात जिंकतो यासाठी लाल व हिरव्या सिग्नलची एक पद्धत आहे, पण तिचा मूळ खेळाशी काही संबंध नाही. )
असं कसं ;) मग कळणार कसं कोण बुडतयं आणि कोण जिंकतयं ते :D