मला लोकरीचे दोन सुयांचे विणकाम आवडते व त्यातच मला लहान मुलांचे मोजे व स्वेटर करायला शिकायचे आहे. शाळेत असताना मी मोजे व स्वेटर विणले होते (शिवण या विषयाच्या अभ्यासक्रमात) त्यामुळे मला टाके कसे घालायचे ते माहीत आहे.  पण त्या आधी येथे दोन सुया व लोकर मिळते का नाही ते आधी पहायला हवे तरच उपयोग. क्रोशाचे विणकाम मी कधीच केले नाही. दिसायला क्रोशाचे विणकाम छानच दिसते.