प्रवासी महाशय,
माझ्याकडे असलेली वा. वा. ह्यांची शायरी लिहितो.

मारतो राजास एक्का,
नहेल्यास दहेला मारतो
कल्पनेचे खेळ सारे,
कोणी कुणाना मारतो
पाहता कोणात काही,
नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे,
छाप नुसते वेगळे
आता जरासा रंग काही,
खेळास येऊ लागला
पत्त्यातला राजा स्वतःला
राजाच मानू लागला.

देवदत्त