बेरीज झब्बूमध्ये खाली पत्ते पालथे पसरून ठेवायचे. नंतर एकेकाने पत्ते सुलटे करायचे. आता उदा. एकाने एक पत्ता उचलून सुलटा केला व तो एक्का असेल आणि दुसऱ्याने दुसरा पत्ता सुलटा केला आणि ती अठ्ठी असेल, तिसऱ्याने अजुन एक पत्ता उचलून सुलटा केला आणि ती जर नव्वी असेल तर ज्याने नव्वी उचलून सुलटी केली त्याने अठ्ठी + एक्का + नव्वी पाने घ्यायची असतात.

मग परत खेळी सुरू. ज्याने वरील तिनही पत्ते गोळा केले त्याने परत एक पान उचलून सुलटे करायचे. ती जर समजा राणी असेल नंतर दुसऱ्याने पान उचलून सुलटे केले आणि ती पण राणी असेल, तर दुसऱ्याने दोन्ही राण्या त्याच्याकडे ठेवायच्या.

काही वेळेला अशी बरीच पाने तयार होतात तरी सुद्धा पाने कोणी उचलत नाही, कारण बेरीज करून तेवढी पाने उचलण्यासारखी नसतात. अशा रितीने पाने उचलून मग त्या हातात आलेल्या पानांमध्ये नेहमीसारखा एक पानी झब्बू खेळतात.

काही वेळेला अशी बरीच पाने सुलटी होतात. आणि अचानक ज्याच्याकडे खेळी येते त्याला ती पाने सर्व उचलायला लागतात. उदा ५= ३+२, आणि शिवाय दुसरी एखादी पंजी असेल तर ती सुद्धा म्हणजे तिर्री, दुर्री, पंजी अशाप्रकारे. किंवा सुलट केलेल्या पानांमध्ये अजून चव्वी व एक्का असेल तर ती दोन्ही पाने पण उचलावी लागतात. म्हणजे ४+१, ३+२, ५=५

गोटूला गोटू असे दोन गोटू, राजाला राजा असे दोन राजे, राणीला राणी अशा दोन राण्या. काही वेळेला हातात एकही पान न येता तो खेळाडू तिथेच बाद होतो.

या खेळामध्ये खूप मजा येते.