पुढे सरसावलेली चिउताई एकवार आत डोकावून पाहत जणू नजरेनेच ते दाणे टिपायची परवानगीमागते. मग हळूच दाणे टिपू लागते. मग दुसरी येते, मग तिसरी येते. आणि काही क्षण चिवचिवाट चालतो. दाणे संपतात.

इकडे माझ्या पेल्यातला चहापण संपलेला असतो. सकाळचा एक सुरेल कार्यक्रम असा पार पडतो. मग मी उठतो. मुंबईचा दिवस सुरु झालेला असतो. मलाही आवरून बाहेर पडायची घाई असते, माझे दाणे जमवायला.

-- मस्तच.