'सर्वसाक्षी बहरात येताना...' असा एक लेख आता लिहायला पाहिजे.
लेखन कसदार होण्यासाठी एक म्हणजे ते थेट अंत:करणातून यायला पाहिजे. संवेदनशीलता ही जातीवंत लेखनाची मूळ गरज. या लेखात ती ठायी ठायी दिसते. छायाचित्रे तर काय कंदी लस्सीच्या जामवर काजूची पूड पेरावी तशी!
व्वा, सर्वसाक्षीजी!
एक (पुणेरी) शंका: लव्हबर्डस चे प्रणयपक्षी हे भाषांतर खटकते.
एक (पुणेरी) सूचना: दिसुन, खुष, तरिही, चुकुन, खाउन, उघडुन, उडुन, ठेउन, पाजुया, अवतिर्ण ... साक्षीजी, मन करा थो....र! दीर्घायुषी व्हा!