बोलायचे मलाही, बोलायचे तुलाही
कोणी सुरू करावे, बस हाच पेच आहे...
चढवून गे मुखवटा, दुनियेत हिंडतो मी
वदनावरी हसू अन्, हृदयात ठेच आहे...
आकर्षणे उथळशी, येऊन खूप गेली
वाटे तुला पहाता, ते आगळेच आहे...

 

केवळ अप्रतिम आहे!!