आठवणी, लेख आणि छायाचित्रे, सगळेच सुरेख आहे. तुमच्या कडून छायाचित्रणाचे धडे घ्यायला हवेत.

पुण्यात आमच्या घरामागे मोकळा आवार आहे. तिथे अनेक पक्षी येतात. त्यातल्या त्यात भारद्वाज पक्षी येणे आणि त्याला न्याहाळणे हे आमचे रोजचे काम. आमच्या गच्चीत चिऊताईंसाठी पाणी प्यायला एक प्लॅस्टिकचे भांडे आहे. मजा अशी आहे की ते धुतले नाही तर चिमण्या येत नाहीत. त्यामुळे रोज ते धुणे हा चिमण्यासाठीचा आमचा नियमच बनला आहे.