तुम्ही लिहिलेले तिन्ही किस्से आवडले.
मी सध्या ४ आठवड्यांसाठी जर्मनीत [लाइपझिग] आलो आहे आणि आमच्या (सीमेन्स) कारखान्याजवळच एक खोली भाड्यानं घेऊन राहत आहे.
मालकाबद्दल (खरं तर मालकिणीबद्दल) माझी तक्रार मात्र उलटी आहे...
एक तर तिला जर्मन भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही. पहिल्या दिवशी मी आलो तेव्हा तिनं माझी पावती तयार ठेवली होती आणि मला ४ ही आठवड्यांचे पैसे आधी भरायला लागले. मी, माझ्या आधी या अतिथी-गृहात राहिलेल्या माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, आठवड्याचे पैसे भरतो असं इंग्रजीतून सांगून बघितलं; पण तिला (सोयीस्करपणे?) माझी भाषा कळत नव्हती!
दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवसापासून ती गायब आहे. माझ्या खोलीच्या भाड्यात ती स्वच्छ करण्याचे वेगळे पैसे घेतलेत आणि दर आठवड्याला ती स्वच्छ केली जाईल हे मला सांगण्यात आलंय.. पण... शेवटी काल मीच खोली साफ केली!
- कुमार