इथे लोक बिनलग्नाचे एकत्र राहतात,२,३ मुलं झाल्यानंतरही लग्न करतात,नाही पटलं तर काडीमोड घेतात आणि दुसरा घरोबा करतात.
इथे ब्रिटिश लोकांचीही तीच कथा आहे. सुरुवातीला फार आश्चर्य वाटायचे. नंतर कळले सगळीकडे असेच आहे. त्यातून यांचा एक दृष्टिकोन असा की लग्न टिकतच नाहीत तर लग्नाचा खर्च तरी कशाला करायचा? असेच राहू, पटलं तर पटलं, नाहीतर नाही. नवऱ्याच्या कचेरीतल्या काही गोऱ्या लोकांशी पार्टीच्या निमित्ताने भेट झाली तेव्हा एक जोडपं गेली ७ वर्षे बिनलग्नाचेच एकत्र राहत आहेत. त्यांना विचारले लग्न केव्हा करणार? तेव्हा तो म्हणाला 'बघू मी तिला लवकरच लग्नाची मागणी घालणार आहे. अजून तिची मानसिक तयारी नाही तशी. किंवा मुले झाल्यावर लग्न करू. इथे त्याने काही फरक पडत नाही तुला माहीतच असेल.'
स्वाती, बाकी तुला इतके छान आजी आजोबा भेटले, तुझे नशीब चांगले आहे. दुसऱ्या देशात जाऊन इतकी आपुलकी दाखवणारी माणसे भेटतात वाचून बरे वाटले.
अंजू