आता मला उमजतं आहे. दृष्टी क्षीण व्हायला लागली की आपण एकमेकांना अधिक स्पष्ट बघू शकतो आणि कानांनी कमी ऐकू यायला लागलं की तुझं स्वत:शी गुणगुणणंही मला अधिक स्पष्ट ऐकू येतय् आणि ना आता माझ्या स्पर्शात वखवख आहे ना तुझ्या स्पर्शात आग्रह आणि केवळ नजरभेटीनंही तृप्तीचे शहारे येऊ शकतात अंगावर.. आता या जाणीवांच्या अद्वैताला एकांताचीच काय तुझ्या माझ्या एकत्र अस्तित्वाचीही गरज नाही.
परिच्छेद छान आहे पण कविता कुठे आहे?