सर्व मनोगतींचे मन: पूर्वक आभार. लेखन आपल्याला आवडले हे वाचून आनंद झाला. हे लेखन जर 'शुद्धलेखन' असते तर मलाही अधिक आवडले असते, परंतु नाइलाज झाला. संगणकातील बिघाडामुळे जाल संपर्क प्रस्थापित झाल्यापासून काही मिनिटांतच तुटत होता. मी लेख संपवून, चित्रे चिकटवून चिकित्सक वापरायला जायचो आणि कोरी पाटी समोर दात विचकायची, जाल संपर्क तुटल्याचा व पुन्हा रुजू न करता येण्याचे वर्तमान समजायचे. मग अखेर संगणक बंद करून पुन्हा चालू करणे व पुन्हा संपर्क साधणे हा एकमेव इलाज. तब्बल तीन वेळा असे झाल्यावर मग शक्य त्या सुधारणा केल्या, संपर्क स्थापला आणि गाड वाट सोडून जायच्या आत सुपूर्द करून मोकळा झालो.
रावसाहेब, प्रणयपक्षी हा शब्द जमत नाही, मग याना बुलबुल च्या चालीवर 'गुलुगुलू' म्हणूया का: :)
नंदन, अशी पाखरे येती हे ही शीर्षक आवडले, धन्यवाद.
तात्या, तुझे पक्षीप्रेम पाहून भरून आले, या आधी त्यांना तुझ्या ताटात पाहिले होते, आज त्यांना तुझ्या हृदयात असलेले पाहून मी विशेष सुखावलो:))
मीराताई, लेखन आपल्याला आवडले हे ऐकून बरे वाटले.
अनेकांच्या पक्ष्यांच्या गुजगोष्टी या निमित्ताने वाचायला मिळाल्या, मजा आली.
पुन्हा एकदा सप्रेम आभार
सर्वसाक्षी
(वि. सू. : आता चिकित्सक वापरला आहे :) )
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.