लेख व छायाचित्रे सुंदर.

मलासुद्धा खिडकीत  किंवा गॅलरीत कठड्यावर येऊन बसणाऱ्या चिमण्या खूप आवडतात. पण त्यांनी थेट पोटमाळ्यावर ठेवलेल्या अडगळीमध्येच आपला संसार मांडला तर मात्र त्यांच्या पिलांचा सतत होणारा चिवचिवाट उच्छाद वाटायला लागतो. पण त्यांना हाकलून द्यावेसेही वाटत नाही.

एकदा इंग्लंडमध्ये राहून आलेल्या दोन छोट्या मुलींना मी काऊ चिऊची गोष्ट सांगितली. नंतर विचारले, "काऊ कसे बोलतो?" उत्तर आले, "मूंऊ"    ( आपल्याकडचे हम्मा). त्यांना फक्त  Cow माहीत होती.