सुंदर लेख...खूप आवडला.
जखमेपेक्षा अपघाताचा आघात अधिक असावा.....खूपच भावले
लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. माझ्या एका शंतनू नावच्या मित्राने एका खोक्यात काही चिमण्या पाळल्या होत्या. खरे तर हे चिमण्या पाळणे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तरी पण रोज घरी येण्याऱ्या चिमण्यांना लळा लावून त्याने त्या पाळल्या होत्या मग मे महिन्याचा सुट्टीत आम्ही खेळायचे सोडून दिवसभर त्यांची देखरेख करत बसायचो. त्यातील एखादी चिमणी दगावायची देखील. तेव्हा तर खरे मरण वगैरे संकल्पना माहीत ही नव्हत्या. पण खूप रडू मात्र यायचे. का ते तेव्हा कळायचे नाही. मग कुठल्यातरी दादाची मदत घेऊन तिला केळीच्या झाडाखाली पुरले जायचे. पण त्या रात्री अख्ख्या सोसायटीमध्ये रात्री कोणाच्याच घरातली मुले मात्र जेवलेली नसायची आणी त्याची चर्चा दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या आया जमून करत असायच्या. ते आठवते.
खरंच ह्या चिमण्या फार फार जिव्हाळ्याच्या!