आमच्या लहानपणी आम्ही या खेळाला मार्कडाव म्हणत होतो. वर दिल्याप्रमाणे चार खेळाडूत खेळला जायचाच पण सहा व तीन खेळाडूंना खेळता येण्याजोगे प्रकारही होते. सहा खेळाडूमध्ये दोन भिडू मागता येत. त्यामुळे बोली करणाऱ्या खेळाडूचे दोन लूजर कव्हर होत व बोली मोठी होत असे. तीन खेळाडूमध्ये खेळतांना चौथ्या खेळाडूचे पत्ते वाटून उपडे ठेवलेले असत व ज्याची बोली ठरेल त्याचा तो भिडू होई पण ब्रिजमधील डमीप्रमाणे त्याचे पत्ते उघडे ठेवले जात. या प्रकारात जास्त धोका असल्यामुळे बोली कमी किंमतीची होत असे.