कविता वृत्ताच्या नियमांत बसली तर उत्तमच. पण कविता प्रसवते त्यावेळी ती क्लिष्टता नकोशी होते. मात्र माझ्या मतें कवितेला एक छंद असला आणि ती त्या छंदात वाचता अथवा म्हणता आली तर ती अधिक प्रभावी होते. कविता मनांत स्फुरून कागदवर उतरते त्यावेळी छंद उमगतोच असें ही नाही. पण ती नंतर, जो छंद जमला त्यात म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर, श्री. पापा यांनी सुचवल्या प्रमाणे ठाकठीक करता येते. कविता गातां येणें अथवा छंदात म्हणतां येणे ही त्या कवितेची प्रशस्ती मानता येते.

एक काव्यरसिक म्हणून मी माझे मत दिले. हा आगंतुक सल्ला वाटल्यास क्षमस्व.