तात्या,
आजीआजोबांची प्रेमकथा महिलामासिकातल्या 'टंपड' प्रेमकथेहून वेगळी आहे,थ्रिलिंग आहे,मान्य.
त्यांची गोष्ट ऐकताना मला महिलामासिकातल्या कथा आठवल्या एवढं मात्र खरं.
अंजू, अग,आमचा एक श्वेन नावाचा मित्र आहे ना,त्याने तर मोठा मुलगा ८ वर्षाचा झाल्यावर आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं,त्यांच्या लग्नात त्यांची तिन्ही मुलं(वयं ८,५ आणि ३)सूटाबुटात मिरवत होती..
जीजि, 'रुचकर' शब्द मला आठवला नव्हता,हा छान पर्यायी मराठी शब्द आहे.आपल्या लग्नपद्धतीबद्दल इथे कुतुहल आहे.पण त्यांना वाटते हिंदी सिनेमात दाखवतात तसेच लग्न भारतात होते.तो गैरसमज दूर करायला मराठी लग्नाची सिडी दाखवावी लागली.'हाऊ इंटरेस्टिंग'बद्दल... इथे बहुतांश लोक जर्मन बोलतात,त्यामुळे असा काही अनुभव आला नाही.
सर्वसाक्षी,खरं आहे आम्हाला दोघांनाही माणसं हवी असतात.
आपण सर्वांनी लेख वाचून प्रतिसाद आणि आपली मतं दिल्याबद्दल धन्यवाद.
अंजू,स्वल्पविराम,सुमीत,विश्वमोहिनी,लिखाळ,इशिता
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
स्वाती