एक वाटी साबुदाणा धुऊन २-३ तास पाव वाटी पाण्यात भिजवून ठेवावा. अर्धी वाटी दाण्याच कूट, चवीप्रमाणे मीठ, मिरची व साखर. बटाटा ऐच्छिक. फोडणी करिता २ टी. स्पून तूप व अर्धा चमचा जिरे.
गॅस लावून कढई तापत ठेवावी त्यात तूप टाकावे तूप गरम झाल्यावर जिरे व मिरची टाकावी व आवडत असल्यास एका बटाट्याचे काप टाकावे व थोडेसे मीठ टाकावे. बटाटा चांगला (तांबूस) परतल्यावर बाकीचे जिन्नस घालावे. ५ मि. परतावी. झाकण ठेवू नये. काहीवेळा साबुदाणा चांगला नसेल तर झाकण ठेवल्यास खिचडी मोकळी होत नाही. बशीत काढून कोथिंबीर व ओल्यावर नारळाचा चव घालून खायला द्यावी. उकडलेला बटाटा घालूनही करता येते. आलं, हिरवी मिरची ठेचा घालूनही छान लागते. वाढणी ४ व्यक्तिंकरिता.