नमस्कार,
मराठीमध्ये (पूर्वी) पद्धतशीर पक्षीनिरीक्षण फारसे झालेले नाही. पक्ष्यांची काही नावे मराठीत आहेत. ती लोकांत प्रचलीत आहेत. पण अनेक पक्ष्यांना खेड्यापाड्यात 'चिमणीच' म्हटले जाते, नाहीतर रंगावरून काहीबाही संबोधले जाते. अनेक ठिकाणी वेगेवेगळ्या नावाने एकाच पक्ष्याला संबोधले जाते. काही वेळा, पक्षी तेथील (अमराठी स्थानीक) नावावरूनही ओळखले जातात. (जर ते मराठी मुलुखात आढळत नसतील तर.)
पण अधुनीक काळांत लोक त्यांचे नामकरण करीत आहेत. काही नावे तयार केलेली आहेत. पण अधुनीक काळांत लोक त्यांचे नामकरण करीत आहेत. काही नावे ओढूनताणून असतात तर काही चपखल.
हमिंगबर्ड - शिंजीर, फुलटोच्या, (जाती नुसार)
हेरॉन - सारंग, बगळा (जाती नुसार) सापमान्या, वंचक अशीही जाती नुसार वेगवेगळी नावे आहेत.(हेरॉनरी = सारंगागार - या पक्ष्यांची रात्री विश्रामाची जागा )
स्टॉर्क - करकोचा, ढोक (बस्टार्डला ढोक म्हणतात काही वेळा करकोच्यालाही म्हणतात असे वाटते.)
क्रेन - क्रौंच
लार्क - चंडोल
पेलीकनचे भारतीय / मराठी नाव शोधायचा प्रयत्न करतो.
(चु. भू. द्या. घ्या.)
--लिखाळ.