स्वाती, लेख आवडला.
येथे अमेरिकेत विनायकचे प्राध्यापक ऍलन मर्चंड व त्यांची चीनी बायको नान्सी यांना पण भारतीय जेवण खूपच आवडते. त्यांना मी आमच्याघरी जेवायला बोलावले होते दोन तीन वेळेला. ऍलन ह्यांना मसाला डोसा, कांदा भजी, बटाट्याचे परोठे खूपच आवडले. नान्सीला पुलाव व भाज्या कोशिंबीरी खूप आवडल्या. श्रीखंड मात्र त्या दोघांनी अगदी एकेक चमचाच खाल्ले. कॅलरीज जास्त होतील म्हणून. जेवणानंतर त्या दोघांनी आयस्क्रीम न खाता चहाची मागणी केली. गंमत म्हणजे ऍलन ह्यांनी आमच्या स्वयंपाकघरात येऊन त्यांच्या पद्धतीचा चहा केला, मी आपल्या पद्धतीचा. त्यांनी फक्त पाणी गरम करून त्यात टी बॅग सोडून चहा घेतला. नान्सीने पण अशाच पद्धतीने चहा घेतला व त्यात लिंबू पिळले. मस्त लागतो असा चहा. त्यांना आपल्या पद्धतीचा चहा आवडला नाही.
दरवर्षी ऍलन हे सर्व विद्यार्थ्यांना भारतीय उपहारगृहामध्ये जेवायला घेऊन जातात. त्यांना इतका उत्साह असतो की उपहारगृह उघडायच्या आत ते तिथे हजर असतात. आणि पहिल्यांदा डोश्याची मागणी करतात.