प्रियालीताई,
अतिशय सुटसुटीत आणि माहितीपूर्ण लेख. अभिनंदन आणि आभार.

हे संपूर्ण मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून  बनवले असून हे पत्थर अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून कोरून मंदिराच्या जागी आणल्याचा पुरावा मिळतो.
येथे वालुकाश्म म्हणजेच सँड्स्टोन आणि प्रस्तर म्हणजे स्ट्राटा अथवा थर. असे असताना वरील वाक्य पुढील प्रमाणे हवे असे वाटते. --
हे संपूर्ण मंदिर वालुकाश्मापासून बनवले असून हे दगड अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून ....

कोणत्याही मंगलस्थानी चार दिशांना चार स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतु:सीमा निश्चित करणे व मध्यभागी असणाऱ्या वास्तूला/ इमारतीला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे. (उदा. सत्यनारायणाच्या पूजेतील चार खांब व मध्यभागी कलश) या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे  दिसते.
हे वाचून ताजमहालच्या रचनेची आठवण झाली.

लेख सुंदरच. प्रकाशचित्रांमुळे अजून आकर्षक झाला आहे.
--लिखाळ.