मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव सर्वश्रेष्ठ पुस्तक निवडा असे मला सांगितले तर मी कोसलाच निवडील.
(कोणी मला उदाहरणार्थ असे सांगणार वगैरे नाही ही गोष्ट विसरा...)
पांडुरंग सांगवीकर उदाहरणार्थ आपला मित्र वगैरेच आहे. मात्र तो मित्र कसा झाला हे गुपित तुम्हाला सांगणार नाही. कारण असे गुपित सांगणारा उदाहरणार्थ मूर्ख वगैरे असतो आणि ऐकणारा भामटा.