माझा संगीताशी तसा काही संबंध नाही. पण यशवंत देवांची करुणा देव ह्यांनी घेतलेली मुलाखत पाहिल्या/ऐकल्यानंतर मला त्यांच्या संगीतातील अचुक (अभियांत्रिकी अचुकता) मार्गदर्शनाची जाणीव झाली. नंतर त्यांचे 'रियाझाचा कानमंत्र' हे पुस्तक मी सलग वाचून काढले. ते वाचत असतांना कुठेही मी मला न कळेलसे काही वाचत आहे असे वाटले नाही. त्यांच्यासारखा गुरू मिळाल्यास संगीत शिकायलाही मला आवडेल, एवढा मी त्यांचा चाहता झालो आहे. 'संगीतामुळे आरोग्यरक्षण होते' ह्या त्यांच्याच म्हणण्याचा प्रत्यय, त्यांच्या स्वत:च्या आरोग्यपूर्ण, संगीतमय जीवनातून येत असतो. त्यांच्या सशक्त संगीतमय जीवनास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
'कधी बहर, कधी शिशीर' हे त्यांचे आत्मनिवेदनही वाचनीय आहे.
त्यांचे 'पत्नीची मुजोरी' हे पुस्तक मला हवे आहे. पण उपलब्ध नाही. कुणी मिळवून देऊ शकेल का?