तुमचे निरीक्षण अचूक आहे आणि शुद्धलेखनाविषयीची तळमळही समजण्यासारखी आहे. जेंव्हा लोक (इतर संकेतस्थळावर) रोमन मधून मराठी लिहीत असत तेंव्हा अश्या चुका सहज लपून जात. मनोगत द्वारे परिचय झालेले थेट लीप्यंतराचे माध्यम पुष्कळांना अपरिचित आहे, आणि त्याची संवय व्हायला काही कालावधी जायला लागेल.

मनोगतला सुरुवात करण्याच्या आधीपासून आमचे ह्या सर्व दृष्टींनी प्रयत्न चालू आहेत. काही अनुभवी सदस्यांशी ह्याबाबत संपर्क झालेला आहे. येत्या काही दिवसातच तुम्हाला शुद्धलेखन आणि व्याकरण ह्यासंबंधीचे लेख येथे वाचायला मिळू लागतील.

मात्र एखाद्या/दीने शुद्ध लिहिणे हे त्या/तिच्याशी वारंवार सहानुभूतिपूर्वक संवाद साधूनच साधेल असे वाटते.