विंदालू ही पाककृती मूळ गोव्याची. ती पोर्तुगीजांनी आणली. मूळ पदार्थ पोर्क किंवा डुकराच्या मांसापासून बनवला जातो ज्यात विनेगर व आलं-लसणाच्या वाटलेल्या गोळीचा समावेश असतो. कालांतराने त्याचे भारतीयीकरण होऊन चिकन विंदालू हा पदार्थ तयार झाला तरी मसाले बदलले नाहीत.
माफ करा स्वातीताई, पण तरला दलाल सारखे पाकशास्त्री ज्या देशांत आहेत तिथे विंदालू म्हणजे विन्ड+आलू म्हणून त्यात बटाटा पडतो असे सांगणारे कमी भेटणाऱ नाहीत. मूळ पाककृतीत बटाटा नाही. तसेच ही उडप्याच्या किंवा पंजाब्याच्या रेस्टॉरंटमधली पाककृतीही नाही.
अशा पाककृतीमुळे मूळ पदार्थाची authenticity जाते असे वाटते तेव्हा वरील पदार्थाला चिकन विंदालू हे नांव देणे अयोग्य आहे.
माझ्या या टिप्पणीसाठी पुरावा देते, तेथे चिकन विंदालूची पाककृतीही मिळेल.