मार्क्स हा अर्थशास्त्र हे समाजाला गतिमान करणारे शास्त्र आहे असं मानतो. त्याच्या मते समाजात दोन वर्ग आहेत. ज्यांच्या कडे समाजातील बहुतांश संपत्ती आहे , मात्र हा वर्ग संख्येने कमी आहे. असा हा 'आहे रे' गट. आणि ज्यांच्याकडे संपत्ती नाही, मात्र संख्येने अधिक असलेला हा 'नाही रे' गट.
या दोघांचे हितसंबंध परस्परांविरोधी असल्यामुळे यांच्यातील वर्गसंघर्ष अटळ मानल्यागेला आहे. तत्काळ निर्णय क्षमतेमुळे आणि बदलामुळे रक्तरंजित क्रांतीचं मार्क्सवादाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे.
मार्क्सच्या काळात तत्त्वज्ञानापर्यंत असलेल्या या तत्त्वज्ञानाला खरी व्यावहारिक जोड दिली ती लेनीन ने. याने रशियात साम्यवाद आणून तो उत्तम रित्या राबवला. त्यांची सुरवातीच्या काळात झपाट्याने झालेली आर्थिक प्रगती पाहता अनेक देशांना याचे आकर्षण निर्माण झाले. १९२८ ला जगातील पहिली पंचवार्षीक योजना अमलात आणल्या गेली ती याच रशियात.
आपल्या भारतीय नेत्यांना सुद्धा या मार्क्सवादाचं आकर्षण होतं. आपलं नेहरू काळातील नियोजनाला साम्यवाद हाच पाया होता. आपला शेजारी चीन येथे सुद्धा राज्यक्रांती होऊन माओ ने साम्यवाद रुजवला. मात्र प्रत्येक देशाने आपापल्या सोयीप्रमाणे यात थोडेफार बदल केलेले दिसून येतात.
आज १००% साम्यवादी देश म्हणून जगात फक्त क्यूबा च दिसतो. अनेक देशांतील साम्यवादाचा प्रयोग फसला, यात पूर्व आशियाई देश येतात.
या विषयाच्या अनुषंगाने अनेक विषयाला स्पर्श होऊ शकतो. साम्यवादाचा प्रसार, त्याची चिनी, रशियन, क्यूबन आणि भारतीय आवृत्ती. शितयुद्ध, अलिप्तराष्ट्र चळवळ, भारतातील विविध मार्क्सवादी संघटना- चळवळी, आदी.
नीलकांत.