पंकजसाहेब,
तुमची आत्मकथा आवडली.
(१) शाळेत असताना इंग्रजीत 'सोलोमन ग्रंडी' नावाची एक कविता होती. तिचा मराठी गोषवारा-
तो सोमवारी जन्मला, मंगळवारी बारसं झालं, बुधवारी लग्न, गुरुवारी आजार, शुक्रवारी बळावला,शनिवारी मेला, रविवारी पुरला!
मला वाटतं आपण बहुतेक सगळेच असेच सोलोमन ग्रंडी असतो.
(२) मेरी क्युरीचं एक भाषण लहानपणी पाठ केलं होतं; ते मात्र वेगळं आहे. ते इंग्रजीतूनच देतोय.
लाइफ इज नॉट ईझी फॉर एनी ऑफ अस, बट व्हॉट ऑफ दॅट! वी मस्ट हॅव्ह परसीव्हरन्स ऍण्ड अबोव्ह ऑल कॉन्फिड्न्स इन अवरसेल्व्हज. वी मस्ट बिलीव्ह दॅट वी आर गिफ्टेड फॉर समथिंग ऍड दॅट धिस थिंग ऍट व्हॉटेव्हर कॉस्ट मस्ट बी अटेन्ड!*
हे तिनं करूनही दाखवलं! म्हणूनच तिचं चरित्र ७०-८० शब्दांत मावत नाही (आणि आता ७०-८० वर्षांनंतरही आपल्याला वाचावंसं वाटतं!)
- कुमार
* ता. क.
इंग्रजी रोमन लिपीतून लिहिलं तर फक्त १०% शब्दांनाच मुभा आहे म्हणून हा देवनागरी खटाटोप करावा लागला!