कॉ. डांग्यांच्या लेखात वाचलेले आठवले ते सांगतो:  त्यांच्या स्टॅलीनच्या बरोबर झालेल्या चर्चेत स्टॅलीन त्यांना म्हणाला की जगात कुठेही "कम्यूनिझम" येऊ शकेल पण "अठरापगड जाती धर्माच्या हिंदूस्थानात मात्र तो येऊ शकणार नाही".

त्या व्यतिरिक्त: भारतीय मार्क्सवादी पक्ष जगातले पहीले पक्ष आहेत ज्यांना निवडणूका लढण्यासाठी का होईना पण भारतीय घटना म्हणून लोकशाही मान्य करावी लागली. पण जेंव्हा चिनशी युद्ध झाले तेंव्हा मात्र त्यांनी भारतापेक्षा चिनला कम्यूनिस्ट राष्ट्र म्हणून जास्त जवळ मानले आणि गप्प राहीले.

मार्क्सवादाने "धर्माला अफूची गोळी मानली" आणि जगभरातील तथाकथीत बुद्धीवाद्यांनी "मार्क्सवाद हाच धर्म करून अफू सारखा वापरला"!

नक्षलवादी आणि तामीळी वाघ कम्यूनिझम मानत आले आहेत.