ओपन न्यू विंडो ही आज्ञा तुम्ही तुमच्या न्याहाळकाला करत असता. तुमच्या न्याहाळकाचे नियंत्रण सेवादात्याला कसे करता येईल/करू दिले जाईल? निदान आमचे ज्ञान तरी ह्याबाबतीत तोकडे आहे. मुळात ओपन इन न्यू विंडो ही आमच्या अनुभवाप्रमाणे अत्यंत निरुपद्रवी आज्ञा आहे. तिने एकामागून एक खिडक्या उघडल्या गेल्याचे ऐकिवात नाही. कदाचित तुमच्या न्याहाळकाचा हा दोष/गुणविशेष/स्वभाव/ठेवण असेल (चू.भू.द्या.घ्या.)