ओपन इन न्यू विंडो मुळे अनेक खिडक्या उघडणे ही अडचण मला इतर कोणत्याही संकेतस्थळामुळे होत नाही. तसेच मनोगतावरील गद्य-पद्य साहित्यातील एखाद्या लेखा-कवितेवर टिचकी मारली तरीही एकच खिडकी उघडते.
हा प्रकार फक्त प्रतिसादाच्या बाबत होतो. जेव्हा प्रतिसादाचा दुवा देताना 'कॉपी शॉर्टकट' मारण्याऐवजी 'ओपन इन न्यू विंडो' दाबले गेले तरच अशी अडचण जाणवते.
कृपया तज्ज्ञांनी खुलासा करावा.