तुमच्या आयुष्यात काय घडले हे सांगण्यापेक्षा तुमच्यामुळे जगात काय बदल घडले हे सांगा. मग बघा ७०-८० काय ७-८ शब्द तरी लागतात का?!
प्रस्तुत बदल म्हणजे रेडियमचा शोध लावण्यासारखे दूरगामी असण्याची गरज नाही. अगदी 'चार लोकांना शिकवून-सांगून दिशा दिली' किंवा 'मी जिवंत असताना ५० झाडे लावली' यासारखे क्षुद्र वाटणारे बदलही चालतील. तुम्ही मेल्यावरही तुम्ही केलेल्या अशा कृती जर टिकतील (दोन-पाच वर्षे का होइना) तर त्यांना तुमच्यामुळे झालेले जगातील बदल म्हणता येतील.
'मी कोट्याधीश झालो.' किंवा 'मला खूप शिकायला मिळाले.'याने जगाला काय फायदा? तुम्ही मेलात आणी त्याबरोबर तुमची संपत्ती आणी ज्ञान दोन्ही निकामी झाले. आत्मचरित्रात लिहून फायदा काय? कागदाचा व्यय!
जर असे बदल तुम्ही घडवून आणले नसतील तर तुमची (म्हणजे आमचीही) आत्मचरित्र लिहीण्याची लायकी सुद्धा नाही. तो एक वायफळ खटाटोप होइल!